Mohammad Kaif esakal
Cricket
BCCI दुटप्पी...! श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी न मिळाल्याने संतापला भारताचा माजी स्टार; म्हणाला, साई सुदर्शनसाठी निकष...
BCCI faces backlash over Shreyas Iyer omission भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघ निवडीवरून वाद उफाळला आहे. श्रेयस अय्यरला संघाबाहेर ठेवून साई सुदर्शनला संधी दिल्याने माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने बीसीसीआयवर टीकास्त्र सोडलं आहे.
Why did BCCI choose Sai Sudharsan over Shreyas Iyer for Test matches? भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू या दौऱ्यावर जातील. या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आणि त्यात श्रेयस अय्यर याचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ( Mohammad Kaif ) याने यावरून बीसीसीआयवर टीका केली आहे. त्याने श्रेयस अय्यरला वगळण्यावरून काही प्रश्न उपस्थित केले, त्याचवेळी साई सुदर्शनच्या निवडीला लावलेल्या निकषावरून बीसीसीआयला अप्रत्यत्रक्ष दुटप्पी असे संबोधले.