IND vs ENG 1st Test: Sachin Tendulkar latest news : तुम्ही इंग्लंडमध्ये गाडी चालवत असाल, तर कारमधील इनबिल्ट टेक्निकल सपोर्ट सिस्टम तुम्हाला सतात स्पीड कॅमेरे आणि स्पीड लिमिटबद्दल माहिती देताना दिसेल. १९९२ मध्ये न्यूकॅसलहून लीड्सला जाताना सचिन तेंडुलकरसोबत याच स्पीड लिमिटवरून पोलिसांनी अडवले होते आणि त्याला खूप मनस्तापही झाला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्समध्ये होतोय आणि त्यानिमित्ताने हा मजेशीर किस्सा आठवला.