Shubman Gill Test captain reason revealed by Sunil Gavaskar : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे सीनियर कसोटीतून एकापाठोपाठ निवृत्त झाले. आता टीम इंडियाचं कसं होणार? असेच सर्वांना वाटत होते, परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी धाडसी निर्णय घेतले आणि युवा खेळाडूंना एकत्रित घेऊन संघ जाहीर केला. रोहितनंतर कर्णधार कोण, यावरही बरीच चर्चा झाली होती. जसप्रीत बुमराह या शर्यतीत होता, परंतु त्याच्या तंदुरुस्तीचं कारण देत त्याला ही जबाबदारी दिली गेली नाही. शुभमन गिल फ्रंट रनर म्हणून समोर आला.