IND vs ENG: शुभमन गिल-गुरनूर ब्रार एकमेकांना धडकले; जॉस बटलरची कॅच पकडण्याच्या नादात हे घडले; Video त पाहा पुढे काय घडले

Shubman Gill and Gurnoor Brar collision vs England: भारत-इंग्लंड पहिल्या वनडेत शुभमन गिल आणि गुरनूर ब्रार यांच्यात झेल पकडताना जोरदार धडक झाली. मात्र गुरनूरने अप्रतिम झेल पूर्ण करत जोस बटलरला माघारी धाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IND vs ENG

IND vs ENG

esakal

Updated on

Shubman Gill and Gurnoor Brar collision vs England: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG)यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात एक क्षण असा आला, ज्यामुळे मैदानावरील खेळाडूंसह प्रेक्षकांचाही श्वास रोखला गेला. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलरचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि युवा गोलंदाज गुरनूर ब्रार यांच्यात जोरदार धडक झाली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की दोघेही क्षणभर मैदानावर पडले. मात्र, सुदैवाने गुरनूर ब्रारने कॅच हातातून जाऊ दिला नाही आणि बटलरला अवघ्या पाच धावांवर माघारी धाडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com