
Abhishek Sharma highest individual score by an Indian in T20I history: आमीर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक, श्रीमंत उद्योगपती अंबानी हे सेलिब्रेटी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असूनही अभिषेक शर्मा खऱ्या अर्थाने आज स्टार ठरला. अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना भारताला ९ बाद २४७ धावांपर्यंत पोहोचवले. ट्वेंटी-२०त एका डावात सर्वाधिक षटकार, भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या असे अनेक विक्रम आज अभिषेकने मोडले.