Chris Woakes bats with dislocated shoulder during IND vs ENG 5th Test : मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी पायाला ख्रिस वोक्सचा चेंडू लागल्याने रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला. दुसऱ्या डावात त्याचे फलंदाजी करणेही अवघड होते.. कारण त्याला एका पायावर जोर देऊन चालणारे नव्हते, डॉक्टरांनीही त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. पण, पठ्ठ्या इंजेक्शन घेऊन मैदानावर उतरला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला... आज तसेच चित्र दी ओव्हल येथे दिसले. इंग्लंडचे ९ फलंदाज तंबूत परतले असताना ख्रिस वोक्सचे फलंदाजीला येणे कोणालाही अपेक्षित नव्हते. कारण, क्षेत्ररक्षण करताना त्याचा डावा खांदा निखळला होता आणि त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती.. तरीही तो आज फलंदाजीला आला अन्...