Jasprit Bumrah fitness management in IND vs ENG 2025 : भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यावरील पाचही कसोटी सामन्यात खेळण्याची विनंती लिटल मास्टर सुनील गावस्कर व चेतेश्वर पुजारा यांनी गोलंदाजाची पत्नी संजना गणेसन हिच्यामार्फत केली होती. संजनाने INDIA vs ENGLAND पहिल्या कसोटीतील ब्रेक दरम्यान जसप्रीतकडे हा प्रस्तावही ठेवला. पण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) त्याच्या प्लॅनवर ठाम आहे. भारताला पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्यानंतरह जसप्रीतला सर्व कसोटीत खेळण्याची मागणी होत असताना गंभीरने त्याच्या रणनीतीवर ठाम राहण्याचे ठरवले आहे.