Harshit Rana joins Indian Test squad for England tour 2025
भारताची इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यास फक्त चार दिवस शिल्लक आहेत. भारतीय क्रिकेट संघातील बहुतेक सदस्यांनी सराव सामने खेळून या स्पर्धेची तयारी केली. या सराव सामन्यात सर्फराज खान , ऋतुराज गायकवाड , अंशुल कंबोज , खलील अहमद , हर्षित राणा हे खेळाडू भारत अ संघाचा भाग होते आणि बरेचसे खेळाडू मायदेशात परतले आहेत.पण, यांच्यापैकी एका खेळाडूला भारताच्या मुख्य संघात सहभागी करून घेतले आहे आणि आता भारताचा १८ नव्हे तर १९ सदस्यीय संघ इंग्लंडला भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.