IND vs ENG : हे चालणार नाही...! गौतम गंभीरने इंग्लिश क्युरेटरसोबत तातडीची बैठक घेतली; केली महत्त्वाची मागणी

Gautam Gambhir meets curator: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेआधीच मैदानावरच्या खेळपट्टीवरून वातावरण तापले आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अॅक्शन मोडमध्ये आला असून त्याने थेट इंग्लंडच्या क्युरेटरची भेट घेऊन केल्या महत्त्वाच्या सूचना...
Gautam Gambhir Sends Stern Message to English Curator
Gautam Gambhir Sends Stern Message to English Curator esakal
Updated on

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ तयारीला लागला आहे. नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. गंभीरही इंग्लिश क्युरेटरना काही सूचना केल्या आहेत. या मालिकेसाठी भारताचे काही प्रमुख खेळाडू भारत अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आधीच आले होते आणि त्यांनी इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सराव सामन्यातही सहभाग घेतला. आता भारत अ आणि मुख्य संघांमध्ये सराव सामना शुक्रवारपासून बेकहॅम कौंटी ग्राऊंडवर सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com