Gautam Gambhir’s dressing room speech praising Rishabh Pant goes viral : शुभमन गिल, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांचे शतक अन् लोकेश राहुलच्या ९० धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चौथी कसोटी अनिर्णीत राखली. भारताच्या पहिल्या डावातील ३५८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभा केला आणि भारतावर दडपण आणले. पण, टीम इंडिया लढली आणि सामना ड्रॉ केला. हा सामना लक्षात राहिल तो रिषभ पंत याच्या लढाऊ बाण्यामुळे... कसोटीच्या पहिल्या दिवशी पायाला दुखापत झाल्यानंतरही रिषभ फलंदाजीला आला अन् अर्धशतक झळकावून बहुमूल्य योगदान दिले.