IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

India vs England 1st ODI live streaming details: भारत-इंग्लंड पहिला वनडे सामना १४ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. सामना किती वाजता सुरू होईल, कुठे पाहता येईल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs ENG 1st ODI

IND vs ENG 1st ODI

esakal

Updated on

India vs England 1st ODI live streaming details: इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर त्यानंतरचे तीन सामने भारताने गमावले.

त्यामुळे मालिकाही हातातून गेली. आता मात्र टीम इंडियासमोर नव्याने सुरुवात करण्याची मोठी संधी आहे. १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत असून, या मालिकेत अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा भारतीय संघाच्या जर्सीत मैदानात दिसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com