IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket News: भारताने पॉवरप्लेमध्ये आयर्लंडच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र त्यानंतर कर्णधार लॉर्कन टकर आणि गॅरेथ डेलनी यांनी अफलातून फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचे सर्व गणित बिघडवले.
Ireland recover from early collapse against India

Ireland recover from early collapse against India

esakal

Updated on

Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket Updates: भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये आयर्लंडच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद केल्यानंतर त्यांचे पुनरागमन अशक्य दिसत होते. पण, ४ बाद ५१ धावांवरून त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी ३-४ झेल टाकल्याचा हा फटका म्हणावा लागेल. आयर्लंडच्या कर्णधार लॉर्कन टकरने ( Lorcan Tucker) अर्धशतक झळकावून फलंदाजांना बळ दिले आणि त्यानंतर गॅरेथ डेलनीचे वादळ घोंगावले. प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात त्याने २७ धावा चोपून काढल्या आणि भारतासमोर तगडे लक्ष्य उभे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com