Ireland beat India in 2nd T20I to win series 2-0
esakal
Ireland vs India, 2nd T20I Marathi Cricket Update: आयर्लंडने इतिहास रचला... दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही रोमहर्षक विजय मिळवून भारताविरुद्धची मालिकात २-० अशी खिशात घातली. भारताने २०२३ नंतर प्रथमच ट्वेंटी-२० मालिका गमावली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पहिल्याच मालिकेत भारताला असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा निम्मा संघ ७५ धावांत तंबूत परतला होता. पण, तिलक वर्मा ( Tilak Varma) आणि शिवम दुबे, ही जोडी मैदानावर उभी राहिली होती. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी चतुराई दाखवली अन् भारताला हार मानण्यास भाग पाडले.