Nitish Reddy has been ruled out of the Ireland T20I series
esakal
India suffer major setback before Ireland tour: भारत-आयर्लंड मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडला रवाना झाला, परंतु संघात निवड झालेल्या अष्टपैलू खेळाडूने अचानक माघार घेतली. नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेतही दुसऱ्या सामन्याला त्याला मुकावे लागले होते. तो आयर्लंड मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल अशी शक्यता वर्तवली गेली होती, परंतु तसे झालेले नाही. त्याला अखेर माघार घ्यावी लागली.