Virat Kohli expressed displeasure after fans cheered Rohit Sharma’s dismissal
esakal
Cricket
IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?
Virat Kohli angry at crowd : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात यजमानांनी बाजी मारून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यात मैदानावरील खेळापेक्षा प्रेक्षकांची प्रतिक्रिया अधिक चर्चेचा विषय ठरली. कोहलीने सामन्यानंतर या प्रकारावर भाष्य केले.
IND vs NZ 1st ODI crowd controversy Vadodara : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवला. वडोदरा येथे खेळवली गेलेली ही पुरुषांची पहिली आंतरराष्ट्रीय मॅच होती आणि त्यामुळे प्रेक्षकही प्रचंड उत्साही दिसले. पण, त्यांच्या एका कृतीने विराट कोहलीचे ( Virat Kohli) डोकं फिरवलं. ९३ धावांची खेळी करणाऱ्या विराटला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले आणि तेव्हा त्याने प्रेक्षकांची चांगलीच कानउघडणी केली. त्याने जे काही घडलं, ते योग्य नसल्याचे स्पष्ट मत मांडले.
