

India New Zealand First T20 Match Preview
Esakal
नागपूर, ता. २० : भारतात पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या - आयसीसी विश्वकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेचा रंगमंच जवळ-जवळ तयार असून, या रंगमंचावर जबरदस्त प्रदर्शन करण्यासाठी सर्वच संघ उत्सुक असून, त्यादृष्टीने प्रत्येक संघ रंगीत तालीमही करीत आहे. विद्यमान विश्वविजेता व यजमान या नात्याने भारतीय संघही जबरदस्त कामगिरीसाठी सज्ज झाला असून, ते आपली रंगीत तालीम न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याने करीत आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर होत असलेली ही लढत पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत होय.