India vs New Zealand T20I
esakal
India vs New Zealand 1st T20I Marathi Live News: न्यूझीलंडने घरच्या मैदानाचा चांगला फायदा उचलला... फिन अॅलन व टीम सेइफर्ट यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर मधल्या षटकांत मयांक यादव व अक्षर पटेल यानी धक्के दिले. पण, हार्ड हिटर किवी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. चार वर्षानंतर टीम इंडियात परतलेला भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) जरा महागडा ठरला, परंतु त्याने एक कठीण झेल टिपून वाहवाह मिळवली. न्यूझीलंडने पहिल्या ट्वेंटी-२०त भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.