IND vs NZ 1st T20I: भारताने टॉस जिंकला, चक्रावणारा निर्णय घेतला! भुवनेश्वर कुमारचे चार वर्षांनी पुनरागमन, Playing XI मध्ये दोन बदल

India vs New Zealand 1st T20I Marathi Cricket News: वर्ल्ड कप २०२६ नंतर भारतीय संघ आतापर्यंत २१ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाच्या तुलनेत ही आकडेवारी १० ने जास्त आहे.
IND vs NZ 1st T20I

IND vs NZ 1st T20I

Updated on: 

India vs New Zealand 1st T20I Marathi Live News: भारतीय ट्वेंटी-२० संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय आणि गेल्या महिन्याभरात श्रेयस अय्यरच्या संघाने जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची घरच्या मैदानावरील पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि आता न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामने खेळण्यासाठी संघ आला आहे. भारतीय खेळाडूंना बदलणाऱ्या हवामानाशी स्वतःला जुळवून घेताना घाम गाळावा लागतोय आणि त्यांना पुरेसा वेळही मिळत नाही. पण, या गोष्टी मागे ठेवून भारतीय संघ किवींविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com