IND vs NZ 1st T20I live streaming and telecast details
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा
India vs New Zealand 1st T20I probable playing XI: भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वविजेता झाल्यापासून सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका १७ ऑक्टोबरला संपल्यानंतर चार दिवसांनंतर टीम इंडियाचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सामोरा जात आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यामधील पहिला टी-२० सामना आज होणार असून, व्यस्त क्रिकेट वेळापत्रकासोबतच श्रेयस अय्यरच्या सेनेसमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकणार आहे. भारतीयांचा फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत कस लागणार आहे. न्यूझीलंडमधील वेगवान गोलंदाजांना पोषक असलेले वातावरण, खेळपट्ट्या, हवेतील गारवा ही बाबदेखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे.