India WTC Final qualification scenario after New Zealand Test draw
esakal
How can India qualify for World Test Championship Final 2027: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजयाची संधी गमावली आणि न्यूझीलंडने त्यांना ड्रॉ निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. पाचव्या दिवसाचा खेळ संपायला तासभराचा खेळ शिल्लक असताना दोन्ही संघांनी ड्रॉ निकाल मान्य करून हस्तांदोलन केले. भारताच्या पहिल्या डावातील ३५२ धावांचा पिछाडी भरून काढताना न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ बाद २३९ धावा केल्या. या निकालामुळे दोन्ही संघांना समान गुणांवर समाधान मानावे लागले आणि दोघांचेही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्याचे गणित बिघडले.