IND vs NZ 1st Test: पहाटे ३:३० चा अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामना कुठे, कोणत्या चॅनेलवर पाहता येणार? तीन सत्रांची वेळ आली समोर...

India vs New Zealand 1st Test live streaming in India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाणार आहे.
India vs New Zealand 1st Test live streaming in India

IND vs NZ 1st Test: When and Where to Watch Live in India, Check TV Channel and Session Timings

esakal

Updated on: 

Where to watch India vs New Zealand Test match live? ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. कसोटीच्या तयारीसाठी शुभमन गिलसह प्रमुख खेळाडूंनी वन डे मालिका अर्ध्यावर सोडली.. रिषभ पंतसह कसोटीचे स्टार न्यूझीलंडमध्ये दाखल झाले अन् कसून सरावाला लागले.

आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दम दाखवण्याची वेळ येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद ( WTC FINAL) स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी भारताला ही मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. न्यूझीलंडनेही जोरदार तयारी केली आहे, त्यामुळे या मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...