IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या आकिब नबीने वेलिंग्टनमध्ये आपली छाप पाडली.
India vs New Zealand 2nd ODI

Auqib Nabi Strikes Twice, KL Rahul Takes Stunning Catch

Updated on: 

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Live Update : आकिब नबीला आणखी एक संधी देण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरला. मोहम्मद सिराज संघात परतल्याने नबीला IND vs NZ दुसऱ्या वन डेत विश्रांती दिली जाईल असे वाटले होते. पण, कर्णधार शुभमन गिलने अंतिम ११ मध्ये कोणताच बदल नसल्याचे जाहीर केले. पहिल्या सामन्यात अपयशी ठरेल्या आकिबने ( Auqib Nabi) वेलिंग्टनमध्ये वाहणाऱ्या वाऱ्याची मदत घेऊन न्यूझीलंडला दोन धक्के दिले. त्याच्या गोलंदाजीत व्हेरिएशन होते आणि त्यामुळेच किवी हडबडले. लोकेश राहुलने ( KL Rahul Stunning Catch) अप्रतिम झेल टिपला. या पार्टीत अंशुल कंबोजही दाखल झाला आणि किवींना तिसरा धक्का दिला.

Loading content, please wait...