IND vs NZ 2nd ODI Live : भारताच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडची दैना! आकिब नबी, गुरनूर ब्रार चमकले; शुभमन गिलची चूक मात्र महागात पडली

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याने किवी फलंदाजांची दाणादाण उडवली. आकिब नबी, अक्षर पटेल आणि गुरनूर ब्रार यांनी प्रभावी गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
IND vs NZ 2nd ODI latest score and match updates

IND vs NZ 2nd ODI latest score and match updates

Updated on: 

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Live Update : आकिब नबी, गुरनूर ब्रार ( Gurnoor Brar ) , अंशुल कंबोज व अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांसमोर न्यूझीलंडने पुन्हा गुडघे टेकले. नबीने सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर पुढील मोर्चा भारताच्या अन्य गोलंदाजांनी सांभाळला. शुभमन गिलने सोपा झेल टाकून डॅरिल मिचेलला जीवदान दिले नसते, तर किवींचा डाव आणखी कमी डावांत गडगडला असता. मिचेलने मिळालेल्या संधीचा फायदा उचलून अर्धशतक झळकावले आणि संघाला शंभरी पार पोहोचवले.

Loading content, please wait...