Nitish Kumar Reddy during a training session, likely to play in 2nd IND vs NZ match
esakal
India vs New Zealand 2nd ODI Marathi Cricket News: निवडलेल्या मूळ संघातील तीन खेळाडू विविध कारणांमुळे संघाबाहेर गेले, परंतु विराट कोहलीच्या कमालीच्या फॉर्ममुळे परिणाम दिसून आला नाही. अशाच परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धची वन डे सामन्यांची मालिका आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासह जिंकण्याची संधी भारतीय संघासमोर आहे. बडोदा येथे रविवारी झालेल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळव्ला, परंतु त्यात गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. या सामन्यासाठी सराव करत असताना रिषभ पंत जायबंदी झाला आणि आणि मालिका सुरू होण्याअगोदर हुकमी फलंदाज तिलक वर्मावर शस्त्रक्रिया झाली. तरीही भारतीय संघाचे पारडे जड राहणार आहे. त्यामुळे आज सुंदरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये गौतम गंभीर कोणाला संधी देतो याची उत्सुकता आहे.