

Ishan Kishan Scores 76 Off 32 But Why Suryakumar Yadav Looked Unhappy
Esakal
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिका सुरू असून भारताने सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलीय. दुसऱ्या सामन्यात २०९ धावांचं आव्हान असताना टीम इंडियाची अवस्था २ बाद ६ अशी झाली होती. मात्र इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर १६ व्या षटकातच ७ गडी राखून भारतानं सामना जिंकला.