Harshit Rana celebrates after dismissing Devon Conway during the 2nd T20I against New Zealand
ESAKAL
Cricket
IND vs NZ 2nd T20I : सुसाट सुटलेल्या न्यूझीलंडला हर्षित राणाने रोखले, विकेटनंतर केला 'तो' इशारा; नेमका अर्थ काय? VIDEO
India vs New Zealand 2nd T20I Marathi Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा सुसाट वेग हर्षित राणाने रोखला. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेचा मोलाचा विकेट घेत हर्षितने भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याचवेळी दुसऱ्या टोकाला वरुण चक्रवर्तीनेही प्रभावी गोलंदाजी करत न्यूझीलंडवर दबाव वाढवला.
India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket Update: डेव्हॉन कॉनवे आणि टीम सेईफर्ट यांनी ज्या प्रकारे डावाची सुरुवात केली, ती पाहता स्टेडियममध्ये स्मशान शांतताच पसरली होती. पण, चौथ्या षटकात चेंडू हर्षित राणाच्या ( Harshit Rana) हाती सोपवला गेला अन् त्याने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. डेव्हॉन कॉनवेला बाद करून हर्षितने असे सेलिब्रेशन केलं, की ते चर्चेत राहिलं. त्यानंतर पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्थीने भारताला दुसरे यश मिळवून दिले.
