IND vs NZ 2nd T20I: भारतीय गोलंदाजांनी फास आवळला! न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी 'चतुराई'ने सापळा रचला; सामना क्षणात फिरला

India vs New Zealand 2nd T20I Marathi Live: सामना न्यूझीलंडच्या बाजूने जात असताना भारतीय गोलंदाजांनी अचानक गेमचा चेहरा बदलला. सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करणाऱ्या किवी ओपनर्सना रोखण्यासाठी भारताने वेग, फिरकी आणि फील्डिंगमध्ये अचूक बदल केले. याच ‘माइंड गेम’मुळे न्यूझीलंडचे फलंदाज एकामागोमाग एक अडकत गेले.
Harshit Rana stopped New Zealand’s flying start with a key wicket

Harshit Rana stopped New Zealand’s flying start with a key wicket

esakal

Updated on

India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket Update: न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी ज्याप्रकारे सुरुवात केली, ते पाहता भारतासमोर धावांचा डोंगर उभा राहिल असे वाटले होते. पण, हर्षित राणाने पहिला धक्का दिला आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांमध्ये जोश भरला.. त्यांनी उत्तम मारा करताना न्यूझीलंडला अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर रोखले. कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. हर्षित राणा व वरुण चक्रवर्थी यांनीही महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com