

IND vs NZ 2nd T20
esakal
INDIA VS NEW ZEALAND 2ND T20 LIVE STREAMING: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेटने विजय मिळवत मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना बदलत्या हवामानाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान होतं. त्यांना सरावासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. तरीही भारतीय संघाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करत यजमान संघावर विजय मिळवला.
आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी वाढवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यात संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी केलेल्या फलंदाजीमुळे संघाचं मनोबल नक्कीच वाढलं असेल.