Dhruv Jurel Slams Fighting Fifty, Turns the Tables on Kiwis; India's Lower Order Delivers
esakal
India vs New Zealand 2nd Test Day 3 Marathi Cricket News: भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी रोमांचक वळणावर आली आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३५६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ११७ धावांवर ७ विकेट्स गमावल्या, त्यामुळे शुभमन गिलच्या संघावर फॉलो ऑनचे संकट होते. पण, आकाश दीप व ध्रुव जुरेल यांनी डावातील सर्वोत्तम भागीदारी करून Follow On टाळला. ध्रुव जुरेल, न्यूझीलंडच्या मोठी आघाडी घेण्याच्या स्वप्नांच्या आडवा आला आणि अर्धशतक झळकावून भारताच्या डावाला आकार दिला.