IND vs NZ 2nd Test Day 2 full match highlights Marathi Cricket News
esakal
New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र आकाश दीपने ( Akash Deep) गाजवले.. त्याने न्यूझीलंडला एकामागून एक असे चार धक्के दिले आणि त्यांना झटपट गुंडाळले. देवदत्त पडिक्कलने दोन झेल सोडले नसते तर किवी ऑल आऊट झाले असते. अंशुल कंबोजने दिवसाची पहिली विकेट मिळवून देतान ग्लेन फिलिप्सचा काटा काढला. त्यानंतर आकाश दीपने पटापट विकेट घेतल्या. टॉम ब्लंडलने ( Tom Blundell) एकहाती किल्ला लढवताना न्यूझीलंडला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.