Dhruv Jurel's Fighting Knock, Bumrah's Comeback and Yashasvi Jaiswal's Stunning Catch Highlight Day 3
esakal
India vs New Zealand 2nd Test Day 3 highlights Marathi Cricket News: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस ध्रुव जुरेलने ( Dhruv Jurel) अविस्मरणीय बनवला. त्यात जसप्रीत बुमराहने अखेर विकेट्सचा दुष्काळ संपवून न्यूझीलंडला धक्के दिले. पहिल्या डावात झेल सोडण्यावरून टीका झालेल्या भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण आज सुधारलेले दिसले. यशस्वी जैस्वालच्या ( Yashasvi Jaiswal Stunning Catch) बॅकवर्ड पॉईंटवर डाईव्ह मारून घेतलेल्या कॅचने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. एवढं सर्व भारताच्या बाजूने घडूनही न्यूझीलंडची सामन्यावरील पकड सैल झालेली नाही. त्यात पहिल्या डावात पाच विकेट्स घेणारा आकाश दीप ( Akash Deep) दुखापतीमुळे सामन्यातूनच बाहेर झाला.