
India vs New Zealand 2nd Test at Pune: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (२४ ऑक्टोबर) सुरू होत आहे.
पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल केले आहेत. भारताने मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे.
त्यांच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यांना संधी दिली आहे.