IND vs NZ 2nd Test Live: शून्य धाव, ३ विकेट्स! भारतीय गोलंदाजांनी गेम पलटवला, न्यूझीलंडच्या डेंजर फलंदाजांना पाठवले माघारी

India vs New Zealand 2nd Test Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडची धावसंख्या ११० असताना भारताने अवघ्या काही चेंडूंच्या अंतरात ३ महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या.
Akash Deep and Anshul Kamboj lead India's fightback

Akash Deep and Anshul Kamboj lead India's fightback

esakal

Updated on: 

New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडने पहिल्या सत्रात पकड मिळवल्यानंतर गुरनूर ब्रारने पहिला धक्का दिला. दुसऱ्या सत्रात त्यांची धावसंख्या ११० असताना भारताने अवघ्या काही चेंडूंच्या अंतरात दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. आकाश दीपने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची ५९ धावांची खेळी संपवली, तर अंशुल कंबोजने हेन्री निकोल्सला १६ धावांवर माघारी धाडले. आकाश दीपने आणखी एक धक्का देऊन न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ११० अशी झाली.

Loading content, please wait...