Yashasvi Jaiswal was bowled by Matt Henry for a duck, while Kyle Jamieson dismissed Devdutt Padikkal for 21 in India's innings
esakal
New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : क्षेत्ररक्षणातील गचाळपणा भारताला महागात पडलेला असताना आकाश दीपने ( Akash Deep) पाच विकेट्स घेऊन न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर आटोपला. पण, प्रत्युत्तरात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला.. चेंडूचा अंदाज घेण्यात अपयशी ठरलेला यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) भोपळ्यावर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही आक्रमकतेच्या नादात सापळ्यात अडकला.