Yashasvi Jaiswal Creates History, Surpasses Sachin Tendulkar; Equals Sanjay Manjrekar’s 32-Year-Old World Record
esakal
New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार शुभमन गिल याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ आजच्या सामन्यात एका बदलासह मैदानावर उतरला, परंतु या बदलात मोहम्मद सिराज, हे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रसिद्ध कृष्णा याच्या जागी गुरनूर ब्रार याला पदार्पणाची संधी दिली गेली. पण, मैदानावर न उतरताच सलामीवीर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) याने वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांना मागे सोडले.