Good news from Hamilton! Toss at 9 AM IST and play begins at 9:30 AM IST. The match will be played over 40 overs per side.
esakal
New Zealand vs India 3rd ODI Marathi Cricket News : हॅमिल्टन येथे मुसळधार पावसाने क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरवले आहे. भारत-न्यूझीलंड यांच्या वन डे मालिकेतील तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अजूनही सुरू झालेला नाही. सुरुवातीला पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ७:३२ वाजता टॉस अन् ८ वाजता मॅच सुरू होईल असे जाहीर केले गेले. पण, पुन्हा धो धो पाऊस सुरू झाला आणि खेळाडू व चाहत्यांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली. पावसामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना अर्धा तास बसमध्येच बसून रहावे लागले होते.