IND vs NZ 3rd ODI Live : शुभमन गिलची 'टॉस' विजयाची हॅटट्रिक! तो निर्णय, पण Playing XI मध्ये केलाय का बदल? मोहम्मद सिराजला मिळाली का संधी?

India vs New Zealand 3rd ODI Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आहे. हॅमिल्टनमध्ये झालेल्या टॉसमध्ये गिलने सलग तिसऱ्यांदा बाजी मारत टॉस विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.
India vs New Zealand 3rd ODI

India vs New Zealand 3rd ODI

esakal

Updated on: 

New Zealand vs India 3rd ODI Marathi Cricket News : भारत-न्यूझीलंड तिसऱ्या वन डे सामन्यावर पावसाचे सावट अजूनही कायम आहे... मुसळधार पावसामुळे हॅमिल्टन सामन्यातील षटकांची संख्या प्रत्येकी ४०-४० अशी करावी लागली. या दौऱ्यावरील सलग तिसऱ्या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे आणि त्यामुळे चाहते काहीसे निराश झाले आहेत. पण, भारतीय संघाने आधीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्याचा आनंद चाहत्यांमध्ये आहे. न्यूझीलंडला आजचा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्याची शेवटची संधी आहे आणि त्यामुळे ते आज नक्कीच जोर लावतील. त्यामुळेच या सामन्याची उत्सुकता अधिक आहे.

Loading content, please wait...