IND vs NZ 3rd ODI Live : रोहित शर्मा, विराट कोहली वैतागले; सर्व खेळाडू बसमध्येच बसून राहिले, हॅमिल्टनमध्ये नेमकं काय घडतंय?

Why are India players waiting in team bus in Hamilton?: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यापूर्वी हॅमिल्टनमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. टीम इंडियाचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले, मात्र मैदानात उतरण्याऐवजी त्यांना तब्बल १५ मिनिटं बसमध्येच थांबावं लागलं.
India vs New Zealand ODI Series

India players waiting in team bus in Hamilton

esakal

Updated on: 

New Zealand vs India 3rd ODI Marathi Cricket News : हॅमिल्टन येथील तिसऱ्या वन डे सामन्याचा आनंद पावसामुळे हिरावून घेतला जाईल, याची भीती कालपासूनच होती. भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा सामना इथे खेळवला जाणार आहे आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडल्यानंतर मंगळवारीही तेच चित्र दिसले. सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले, मात्र मैदानात उतरण्याऐवजी त्यांना तब्बल १५ मिनिटं बसमध्येच थांबावं लागलं. विशेष म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह भारतीय संघातील सर्व खेळाडू बसमध्येच बसून होते. न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही अशीच परिस्थिती होती.

Loading content, please wait...