India vs New Zealand 3rd T20I Marathi News :
esakal
India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket Update: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा संघ एक प्रबळ दावेदार म्हणून मैदानावर उतरेल, यात शंकाच नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवचा संघ ज्या पद्धतीने ताकद दाखवतोय, ते पाहता वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्याचा पराक्रम संघ करेल असा विश्वास वाटतोय. पण, अजूनही सलामीवीर संजू सॅमसन याला येणारे अपयश, संघाची डोकेदुखी वाढवू शकतो. अशा परिस्थितीत संजूसाठी आजची शेवटची संधी असेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.