rishabh pantesakal
Cricket
IND vs NZ 3rd Test : Rishabh Pant वर रोहित शर्मा एवढा का खवळला? ड्रेसिंग रूममधील Viral Video चा सर्वांना बसलाय धक्का
India vs New Zealand 3rd Test : भारताच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला सुरूंग लावला आहे. किवींचे ६ फलंदाज १३१ धावांवर तंबूत परतले आहेत.
India vs New Zealand 3rd Test : भारत-न्यूझीलंड तिसरी कसोटी रोमांचक वळणावर आली आहे. भारताला २८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागल्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात १३१ धावांवर ६ विकेट्स पडल्या आहेत. आर अश्विनने घेतलेला अफलातून झेल हा सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला. त्यात अश्विनच्या बेस्ट कॅरम बॉलवर ग्लेन फिलिप्सचा उडावेला त्रिफळा चकित करणारा होता. न्यूझीलंडने १०३ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांचा ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.