IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Gautam Gambhir reaction after India all out for 89 against New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजीचा अक्षरशः धुव्वा उडाला. मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली आणि संपूर्ण संघ अवघ्या ८९ धावांत तंबूत परतला.
Gautam Gambhir reaction after India all out for 89 against New Zealand

Gautam Gambhir reaction after India all out for 89 against New Zealand

esakal

Updated on: 

India vs New Zealand 4th ODI Marathi Cricket News : भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या ३३३ धावांचा पाठलाग करताना भारताने ८९ धावांवर नांग्या टाकल्या. न्यूझीलंडने २४४ धावांनी हा सामना जिंकला आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा दुसरा लाजीरवाणा पराभव ठरला. २००० मध्ये श्रीलंकेने शारजाह येथे २४५ धावांनी भारताला हरवले होते. मॅट हेन्रीने २७ धावांत ६ विकेट्स घेऊन भारतीय फलंदाजांना पहिल्याच षटकात ३ धक्के दिले. या लाजीरवाण्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली.

Loading content, please wait...