Virat Kohli Pulls Gurnoor Brar Away After Heated Exchange with New Zealand Batter; Video Goes Viral
esakal
India vs New Zealand 4th ODI Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि न्यूझीलंडचा फलंदाज टीम सेइफर्ट यांच्यात ( Gurnoor Brar and Tim Seifert heated exchange) शाब्दिक चकमक झाली. दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आल्याने मैदानावरील वातावरण तापले. हा वाद चिघळण्यापूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) धाव घेतली अन् भारतीय गोलंदाजाला मागे ओढले.