
IND vs NZ Champions Trophy 2025: चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत गेल्या रविवारी पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरी निश्चित झालेला भारतीय संघ तब्बल आठवड्याच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा मैदानात उतणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची अखेरची साखळी लढत ताकद आजमावणारी आहे.
मोठ्या विश्रांतीमुळे भारतीय संघाला तिसऱ्या साखळी सामन्याअगोदर मिळाल्याने खेळाडू ताजेतवाने झाले आहेत. दरम्यानच्या काळात भारतीय संघाने बुधवार आणि शुक्रवारी सराव केला. बाकी दिवस आराम केला. सामन्याच्या आदल्या दिवशीही संघाने सराव न करायचा निर्णय घेतला. हॉटेलच्या व्यायामशाळेत मेहनत करून बाकी वेळ खेळाडू थोडे फिरून मग हॉटेलातच बसून होते. न्यूझीलंड संघाने मात्र बदललेल्या हवामानाचा आणि खेळपट्टीचा अंदाज यावा, म्हणून सराव केला.