
Champions Trophy 2025: रविवारी (२ मार्च) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे, पण अ गटात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी या दोन संघात स्पर्धा आहे. रविवारी होणारा सामना जो संघ जिंकेल, तो संघ अ गटात अव्वल क्रमांक मिळवणार आहे. हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना आहे.