IND vs NZ Final Live: स्टम्प के पास क्यू नही आता तू... ! कुलदीप यादववर पुन्हा भडकला रोहित शर्मा, विराट कोहली संतापला Video

India vs New Zealand Champions Trophy Final 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला! न्यूझीलंडच्या फलंदाजाला बाद करण्याची सुवर्णसंधी कुलदीप यादवने गमावली.
Rohit Sharma Furious at Kuldeep Yadav for Missing Run-Out Chance
Rohit Sharma Furious at Kuldeep Yadav for Missing Run-Out Chanceesakal
Updated on

Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनलमध्ये बऱ्याच चुका केल्या आणि त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रोहित व श्रेयस अय्यर यांच्याकडून झेल टाकले गेले. या चुका काही अंशी भारताला महागात पडल्या, पण, कुलदीप यादवकडून ( Kuldeep Yadav) झालेली चूक रोहितसाठी संताप आणणारी होती. विराट कोहलीही या घटनेनंतर निराश दिसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com