Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणखी एक आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीतील इतिहास काही असला, तरी आज जिंकणार तर आम्हीच, अशी टीम इंडियाने तयारी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची फायनल दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे आणि ३७ वर्षीय रोहित शर्माचा हा शेवटचा वन डे सामना असल्याची चर्चा जोर धरतेय. फायनलसाठी तयार असलेली खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक असल्याचा आकाश चोप्राने सांगितले आहे. दुसऱ्या डावात ही खेळपट्टी संथ होईल असेही त्याने सांगितले. त्याने २७०+ धावा हा विजयासाठी पुरेशा असल्याचा दावा त्याने केला आहे.