Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : भारताच्या फिरकीपटूंनी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे मैदान गाजवताना न्यूझीलंडला बॅकफूटवर फेकले आहे. वरुण चक्रवर्थीने पहिली विकेट मिळवून दिल्यानंतर कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. जवळपास १२ वर्षानंतर जड्डूने आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये विकेट घेतली. पण, एवढं सगळं असूनही रोहित शर्मा ( Rohit Sharma) उप कर्णधार शुभमन गिलवर खेकसताना दिसला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.