Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live :भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून इतिहास घडवला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा तो जगातील एकमेव संघ ठरला. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या ७ बाद २५१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ६ बाद २५४ धावा केल्या. रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांनी फलंदाजीत दमदार खेळ केला.