
लाहोर : दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीत शतकी खेळी साकारत न्यूझीलंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या केन विल्यमसन याने अंतिम फेरीबाबत आपले मत व्यक्त केले. त्याने यावेळी टीम इंडियाला मिळत असलेल्या अडव्हांटेजवर मत व्यक्त केले. तो म्हणाला, भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स करंडकातील सर्व लढती दुबईत खेळलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा संघ दुबईशी एकरूप झालेला आहे. तेथे कशा प्रकारे खेळायला हवे हे त्यांना चांगलेच माहीत आहे, पण आम्हीही तशाच प्रकारच्या वातावरणात थोडेफार क्रिकेट खेळलेलो आहोत. त्यामुळे फायनलसाठी आम्ही सज्ज आहोत.