Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. न्यूझीलंडच्या २५१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी १०५ धावांची सलामी देऊन इरादा स्पष्ट केला. मधल्या षटकात रोहित, गिल व विराट कोहली यांच्या विकेट्सने टीम इंडियाची धाकधुक वाढवली. पण, अक्षर पटेल व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer)यांनी किल्ला लढवला.